पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दावा केला की शरद पवार हे भारतीय राजकारणातील “भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार” आहेत. पुण्यातील (Pune) भाजपच्या (BJP) अधिवेशनादरम्यान हे आरोप करण्यात केले. शाह यांनी विरोधी आघाडी, महाविकास आघाडी (MVA) आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली.
शाह म्हणाले, “भारतीय राजकारणात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार कोण असेल तर ते शरद पवार आहेत. या देशात भ्रष्टाचाराचे संस्थात्मकीकरण करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते शरद पवार आहेत. त्याबद्दल माझ्या मनात अजिबात संभ्रम नाही. ” असं ते म्हणाले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.
- रोहित, विराट, यशस्वीचा ‘विराट’ शो! टीम इंडियाचा तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिका खिशात!
- ‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!
- ‘मार्ग वेगळे, पण दिशा एकच!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ विचारात अंतर नाही
- मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष
- बाबासाहेबांनी देशाला दिलेली ‘ती’ सर्वात मोठी देणगी! विविधतेत एकता टिकवून ठेवणाऱ्या संविधानावर राज्यपालांचे मत