Tuesday, December 3, 2024

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Share

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच आता नुकतेच काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या संजय निरुपमांनी (Sanjay Nirupam) एक ट्विट करत शरद पवारांबाबत मोठा दावा केला आहे.

“शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत होते. पण शरद पवार यांनी यामध्ये एक अट ठेवली होती ती म्हणजे आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती. पण ती अट काँग्रेसने फेटाळून लावली” त्यामुळे राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलीनीकणाचा हा कार्यक्रम प्रलंबित आहे”, असा खळबळजनक खुलासा संजय निरुपम यांनी केला आहे.

“पण आज जी बदललेली राजकीय परिस्थिती आहे, त्यानुसार त्यांचा पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कदाचित त्यांना अशी भीती वाटते कि, बारामती त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकते, यामुळे, कदाचित आपल्या मुलीचं पुनर्वसन करण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम ते करू शकतात. परंतु मला असं वाटतंय कि, या विलिनीकरणाने शरद पवारांना किंवा काँग्रेसला काही फायदा होईल असं वाटत नाहीत. कारण दोन्ही पक्ष तोट्यात चालणाऱ्या कंपन्या आहेत. जेंव्हा दोन शून्य मिळतात तेंव्हा मोठा शून्य तयार होतो. तरीही त्यांची धडपड सुरु आहे,” म्हणत संजय निरुपम यांनी शरद पवार आणि काँग्रेस टोला लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख