Wednesday, December 4, 2024

देशहितासाठी निर्भयपणे १०० टक्के मतदान करा प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन

Share

चैतन्य उपासना मंडळ व सजग रहो अभियाना अंतर्गत रविवारी अमनोरा प्लाझा हडपसर पुणे येथे शेफाली वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ५५० महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रेरक कार्यक्रम पार पडला.
सौ वैद्य म्हणाल्या “आपल्या देशातील सर्व प्रकारच्या भौतिक प्रगती बरोबच आपल्या महान संस्कृती परंपराचा सार्थ अभिमान मिरवता येणं हे सुद्धा विकसित भारताचे लक्षण आहे.भारतीय पारंपरिक पेहराव केल्याने साडी नेसून कपाळावर ठसठशीत कुंकू लावून वावरल्याने आपण प्रतिगामी,मागास ठरत नाही.
शाळेत विजयाचा संघर्षाचा इतिहास शिकवला गेला पाहिजे.आपल्याला भौतिक प्रगती हवीच आहे पण संस्कृती चा बळी देऊन नको.”
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मगरपट्टातील सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन सुखदेव शिंदे यांनी अनेक ज्वलंत विषयावर प्रश्न विचारून शेफालीजींचे परखड मत जाणून घेतले.
चैतन्य मंडळाच्या सौ निलम यांनी सूत्रसंचालन केले. श्री अमीत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अन्य लेख

संबंधित लेख