मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा
वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूरात (Solapur) होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते
40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरणअभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत विविधसूचना केल्या आहेत. यावेळी सोलापूर (Solapur)शहरातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचे
वाटप करण्यात आलेले आहे. दिलेल्या जबाबदारी प्रमाणे प्रत्येक विभागाने आपली
जबाबदारी अत्यंत दक्षपणे पार पाडावी. तसेच या सोहळ्यात येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना
कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबतची खात्री करावी, असे निर्देश आशीर्वाद
यांनी दिले आहेत.
यावेळी शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांची दलाने उभी करण्याच्या दृष्टीने नियोजन
करावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या चारशे मोठ्या वाहनांसाठी शहर पोलीस वाहतूक
विभागाने पार्किंगची व्यवस्था करावी असंही आशीर्वाद यांनी म्हटले आहे.