Saturday, September 7, 2024

उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक

Share

पुणे : मोठं शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) महायुतीच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) जाऊन जोडीने दर्शन घेत गणरायाची आरती केली. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाकडे लागलेलं आहे. सुनेत्रा पवार यांचा सामना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याशी होणार आहे.

सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रचारात झोकून देऊन पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहेत. पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये बारामतीत पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. बारामतीवर एकहाती वर्चस्व गाजवलेल्या पवार कुटुंबातच वर्चस्वाची लढाई होताना दिसत आहे.

आज मोठं शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मोदींनी तिसऱ्यांना पंतप्रधान बनावं यासाठी आपले उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे, त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले. मी नक्की निवडून येणार, असा विश्वास सुनेत्रा पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.

NB मराठीच्या WhatsApp चॅनल फॉलो करा : https://whatsapp.com/channel/0029VaWO0HLCRs1iZlueP42F

अन्य लेख

संबंधित लेख