शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या गटाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह देण्याची शरद पवार यांच्या वतीने केलेली मागणी नाकारण्यात आली आहे. या निर्णयाने शरद पवार गटाच्या आशा खंडित झाल्या आहेत.
यापूर्वी, शरद पवारांनी आपल्या गटाला अजित पवार गटापासून वेगळे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. त्यांची मागणी होती की, अजित पवारांना घड्याळ चिन्ह वापरू न देता दुसरे चिन्ह द्यावे. हे चिन्ह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले जावे, मात्र निवडणूक आयोगाने आणि नंतर सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे
अजित पवार यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाच्या मागणीला जोरदार विरोध केला. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आमच्या काही उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केले आहेत, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार असल्याचे आदेश दिले..