Wednesday, December 4, 2024

शिवचैतन्य जागरण यात्रा : “हिंदू समाजाच्या एकतेसाठी मतदान करा”; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची हाक

Share

“शिवचैतन्य जागरण यात्रा, अहिल्यानगर: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवचैतन्य जागरण यात्रा च्या (Shiv Chaitanya Jagran Yatra) निमित्ताने श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांनी ४ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे आले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची महती सांगत, “देश, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांचे जीवनचरित्रच मार्गदर्शक ठरते,” असे विधान केले.

यावेळी विविध धार्मिक समुदायातील महंत, साधू, संत व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांनी हिंदू धर्माच्या इतिहासातील विजयनगर साम्राज्याच्या गौरवशाली काळाचा उल्लेख करत, कसे बाह्य आक्रमकांनी संस्कृतीवर आघात केला, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, “अधर्माने देशावर जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, आणि लोकांची अमानवी वागणूक घालवली. आजही अशा षडयंत्रांचे सावट आपल्या समाजावर आहे. या परिस्थितीत, छत्रपतींच्या मार्गदर्शनाने धर्मसंरक्षणाचे कार्य करणे आवश्यक आहे.”

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, “२५० वर्ष विजयनगर साम्राज्यावर समृद्धीचं वरदान होतं. हिंदू संस्कृती तेजाळत होती. परंतु, मोघल आक्रमणांमुळे हे सर्व नष्ट केलं गेलं. त्यांनी असा भ्रम पसरवला की, या देशात पुन्हा हिंदू राजा होऊ शकत नाही. जिजिया कर भरल्याशिवाय पूजा करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हे केवळ राजकीय आक्रमण नव्हतं; ते आपल्या संस्कृतीचा विनाश करणारं होतं. संपत्ती लुटली जात होती, मंदिरांचा विध्वंस केला जात होता, मूर्तींचा नाश केला जात होता. गोमातेचा अपमान भर रस्त्यात केला जात होता, आणि लोकांना हालहाल करून मारलं जात होतं. तेवढंच नाही, तर काफिरांच्या स्त्रिया ह्या त्यांची संपत्ती मानल्या जात होत्या, त्यांना जबरदस्तीने नेलं जाऊ शकतं अशी परिस्थिती होती. तरुणांचा संहार चालू होता.”

यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर भाष्य केलं आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य काय असावे, यावर मार्गदर्शन केलं. शिवाजी महाराजांच्या विविध घटनांचे दाखले देत राष्ट्रकार्याची प्रेरणा त्यांनी उपस्थितांना दिली. ते म्हणाले, “मी आज त्यांचे स्मरण का करतोय? कारण ज्या प्रकारचं संकट छत्रपतींच्या काळात समाजावर होतं, तशीच संकटे आजही आपल्या भोवती आहेत. आंतरराष्ट्रीय षडयंत्रं चालू आहेत, ज्यांचा उद्देश या देशाचे तुकडे करणे, त्याला एकसंध राहू न देणे, हिंदू समाजाला कमकुवत करणे हा आहे. परंतु, हे संकट असूनही आपला देश प्रगती करतो आहे, कारण तो भगवान श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती निष्ठावान आहे.”

“ते पुढे म्हणाले, ‘एकीकडे देशाची समृद्धी वाढत असताना, शिक्षण प्रणाली बदलत असताना, आणि वैज्ञानिक प्रगती होत असताना दुसरीकडे हा देश आपला नाहीये अशी शंका निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. रोहिंग्या शरणार्थ्यांचे वाढते आगमन, घुसखोरी आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी ही गंभीर समस्या आहे; याचा कधी विचार होणार का? वक्फ बोर्डाचा कायदा कधी झाला हे आपल्याला समजलेच नाही, १९९५ मध्ये तो लागू केला गेला. आता तर बद्रीनाथसारख्या ठिकाणांवरही दावा केला जात आहे. उद्या कदाचित हे लोक तुमच्या घरांवरही दावा करतील आणि तुम्हाला काहीही करता येणार नाही अशी स्थिती होईल.

त्यांनी पुढे म्हटले की, ‘काही ठिकाणी हिंदूंवर बलात्कार होऊन त्यांना अमानुष प्रकारे मारले जात आहे; हे थांबवायचे का नाही? संकट जवळ आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज शस्त्र हाती घ्यायची गरज नाही, पण २० नोव्हेंबरच्या निवडणुकीत मतदानाचा वापर मोठ्या शस्त्रासारखा करू शकतो. काही समाज इतका निष्काळजी आहे की, दुबई-मस्कटमधून लोक मतदानासाठी विमानाने येतात आणि इथले लोक मतदानाला जात नाहीत. मतदान न करणारे समाजाचे खरे शत्रू आहेत. जात-धर्म बाजूला ठेवून हिंदू म्हणून मतदान करा.’

यानंतर सर्वांनी एकत्र प्रतिज्ञा घेतली, ‘आम्ही सर्वजण मतदान करू, आणि हिंदू संस्कृती व राष्ट्रहितासाठी योग्य उमेदवाराला मतदान करू.’”

“कार्यक्रमाच्या प्रारंभी, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाटदेवळेकर महाराज, ह.भ.प बबन महाराज बहिरवाल (श्रीसंत मदन महाराज संस्थान, कडा) आणि समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले. त्यानंतर, प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाटदेवळेकर महाराज, ह.भ.प बबन महाराज बहिरवाल, आणि समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनीही आपले संत विचार उपस्थितांना मार्गदर्शन म्हणून दिले.”

अन्य लेख

संबंधित लेख