Thursday, October 10, 2024

एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

ठाणे लोकसभा : ठाणे लोकसभा (Thane Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी ठाणे शहरात रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

यावेळी मुख्यंमत्री म्हणाले, “नरेश म्हस्के यांना दिले जाणारे मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मिळणारे मत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे” असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांना केलं.

“यंदाची निवडणूक ही विकासाची निवडणूक असून देशाला खरोखरच पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करावे लागतील. पंतप्रधान मोदीजी यांनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. देशाच्या जीडीपी मध्ये सर्वाधिक भर घालणारे आपले राज्य आहे. पाच ट्रीलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर त्यासाठी एमएमआर रिजनचा त्यात मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या जागेवर महायुतीचेच उमेदवार जिंकायला हवेत. त्यासाठी एकदिलाने कामाला लागा आणि म्हस्के यांना बहुमताने विजयी करा” असे आवाहन ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

अन्य लेख

संबंधित लेख