तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं
निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या लाडू प्रसादात कथितरीत्या प्राणिज चरबीचा वापर
झाल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने, या संदर्भात विचारणा
केली. त्यावर मंदिर व्यवस्थापनाच्या वकिलांनीही या अनुषंगाने तपास करावा लागेल, असं सांगितलं.
लाडूमध्ये प्राणिजन्य चरबीच्या भेसळीबाबत खात्री होण्यापूर्वीच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार
परिषदेत विधान करण्याची आवश्यकता नव्हती, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने
वागावं, आणि देवाला राजकारणापासून दूर ठेवावं, असं मतही न्यायालयानं नोंदवल्याचं, वृत्तसंस्थेच्या
बातमीत म्हटलं आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या तीन तारखेला होणार आहे.
तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
Share
अन्य लेख