Saturday, October 12, 2024

सत्तेसाठी स्वतःचे हिंदुत्व काँग्रेस-राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी

Share

मुंबई : ‘स्वतःचे हिंदुत्व (Hindutva) तर सत्तेसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी झाली आहे’, असा घणाघात भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी नाव न घेता उबाठा गटावर (UBT) अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ‘गोमातेला ‘ राज्यमाता ‘ म्हणून घोषित केल्यावर तुमच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे. ज्या काँग्रेसच्या सत्तेच्या काळात सर्रास कत्तलखाने सुरू होते, ज्या काँग्रेस शासित राज्यात बीफ खाल्ले जाते, त्या काँग्रेसचे गुलाम झाल्यावर तुमच्या कडून वेगळी काय अपेक्षा असणार?,’ असा सवाल केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’ मीडिया वरून केला आहे. ट्विट करत त्यांनी सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखावर कडक शब्दात टीका केली आहे.

‘हिंदुत्वाला शेंडी जानव्याचे हिंदुत्व असे हिणवत शरद पवारांना खुष करत तुम्ही त्यांचेही गुलाम असल्याचे सिद्ध केले आहे. स्वतःचे हिंदुत्व तर सत्तेसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विकल्यामुळे तुमची अवस्था भाकड बैलासारखी झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे लिहितात, ‘गेल्या काही दिवसांत धर्मनिरपक्षतेच्या नावाखाली मत देणाऱ्या समुदायाला खुश करण्यासाठी जातीय सलोखा बिघडवण्याचे काम कोणी केले आहे, हे सगळ्यांनी बघितले आहे. महायुती सरकारने त्याला फक्त विकासातून उत्तर दिले आहे. लोकांचा महायुती वर पूर्ण विश्वास आहे. चार खोट्या ओळी लिहून बोलून लोकांना फसवून मतं मिळवण्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे राजकारणापासून कशाला आणि कोणाला दूर ठेवायचे, दुसऱ्यांना सांगण्याआधी तुम्हीच बघा,’ असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.

अन्य लेख

संबंधित लेख