Monday, October 7, 2024

भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता; सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान

Share


महाराष्ट्र : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” म्हणत त्यांनी भगव्या ध्वजाचा अवमान केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. यावरून आता राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला आहे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट मध्ये काय म्हणलंय पहा…

“परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत.

“उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा…” असं ते म्हणाले.

कभी थे अकेले हुए आज इतने
नही तब डरे तो भला अब डरेंगे
विरोधों के सागर में चट्टान है हम
जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे
लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा
कदम बढ रहा है कभी न रुकेगा
न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा
निडर है सभी हम अमर है सभी हम
के सर पर हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता है भगवा हमारा॥

भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंना म्हणाले..

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे…

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांचा राग आहे. एक तर महाराष्ट्रात जन्मलेला माणूस आणि दलित कुटुंबात जन्मलेला विद्वान माणूस त्यांना खटकत आहे. त्यांच्याबद्दलचा द्वेष आहे. म्हणूनच ते संविधान बदलत आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कशी मानायची? म्हणून त्यांना घटना बदलायची आहे असेही ठाकरे यांनी सांगितले. तसेच, नड्डा बोलले की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी एक विधान, एक निशाण एक प्रधान आहे असे ते म्हणाले. आम्हाला वाटले होते की, तिरंग्यासाठी करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. यांचं फडकं फडकत होतं. ते फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार आहे. संविधान तसेच राहणार आहे. पंतप्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार आहे. पुतीनसारखा निवडून येणार नाही, अशी टीका त्यांनी संघावर केली.

अन्य लेख

संबंधित लेख