Tuesday, December 3, 2024

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा…

Share

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वस्तूत: भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला
जनतेने भरभक्कम बहुमत देऊन राज्य करण्याचा जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लोभाने
आंधळे होऊन उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडून, मविआत जात राहुल गांधी, सोनिया
गांधी आणि शरद पवारांचे मांडलिकत्व स्वीकारून जो खेळखंडोबा केला त्याकडे पहाता
मविआच्या कारभाराचे वर्णन “अंधेरनगरी चौपट राजा” ही म्हण वापरुन करता येते.

भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १६४ मतदारसंघात उमेदवार उभे केले
होते. त्यापैकी १०५ जागांवर त्यांचा विजय झाला. संयुक्त शिवसेनेने १२८ जागांवर
निवडणूक लढविली आणि त्यांना केवळ ५६ जागा जिंकता आल्या. तर आघाडीमधील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२१ जागा लढविल्या होत्या आणि त्यापैकी त्यांना ५४ जागांवर
विजय मिळाला. तर काँग्रेसने १४७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी त्यांना ४४ ठिकाणी
विजय मिळाला. थोडक्यात, २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीला एकूण १६१ जागी
विजय मिळून त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर
आघाडीचा सपशेल पराभव झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही मुळातच पवारांनी काँग्रेसमध्ये सतत सत्तेचा स्वार्थासाठी अमर्याद
वापर करून देखील असंतुष्ट राहिलेल्या भ्रष्ट, संधीसाधू नेत्यांची बांधलेली मोट आहे. याच
दोन पक्षांच्या कारकीर्दीत राजकीय वरदहस्त मिळून संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद
फोफावला. याच कारणाने लोकांनी दिल्लीत नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस
यांच्या नेतृत्वाखालील युतीला पुन्हा निवडून दिले होते. जनतेशी विश्वासघात करत युतीतून
फुटून बाहेर पडत सत्तालोलुप उद्धव ठाकरेंनी मविआशी युती केली आणि त्यामुळे २८
नोव्हेंबर २०१९ ते ३० जून २०२२ या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात
राज्यात संपूर्ण अनागोंदी माजली. संजय राऊत, भास्कर जाधव, किशोरी पेडणेकर अशा
बाष्कळ बडबड करणार्‍या वाचाळवीर भाटांच्या घोळक्यात सदैव रमणार्‍या, कायम शरद
पवारांसारख्या खोडसाळपणासाठी गाजलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने चालणार्‍या आणि
घरकोंबड्याप्रमाणे आपल्या मातोश्री या राजवाड्यासारख्या आलीशान घराबाहेर पायही न
ठेवण्यार्‍या आणि फेसबुक लाईव्ह वगळता जनतेशी सर्व संपर्क तोडलेल्या उद्धव ठाकरेंचे या
काळातले वर्तन वगनाट्यात दाखवला जातो अशा “परधानजी, आज आमच्या राज्याची काय
खबरबात” असे विचारणार्‍या चौकट राजाप्रमाणेच होते.
अशा राजाच्या काळात राज्यात सर्वत्र अंदाधुंद माजली नसती तरच नवल, आणि
महाराष्ट्रात नेमके तेच झाले. नशीब बलवत्तर म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी या
बेबंदशाहीचा वीट येऊन बंड केले आणि देवेंद्र शिंदे, एकनाथ शिंदे, अजित पवार या

त्रिमूर्तीला उरलेल्या काळात गुंडगिरी, खंडणी वसूली, दहशतवाद, दारिद्राच्या गाळातून राज्याला बाहेर काढण्यासाठी अपार कष्ट करण्याची संधी मिळाली. आता पुन्हा असाच खेळखंडोबा होऊ नये यासाठी आपण मतदारांनी सजग बनून महायुतीला विजयी करणे ही आज काळाची गरज आहे. हे करण्यात आपण हयगय केली तर महाराष्ट्रात पुन्हा अनागोंदी माजेल आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल.

अन्य लेख

संबंधित लेख