महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाचे (congress) विसर्जन करावे असे म्हटले होते. परंतु तसे न होता कॉंग्रेस पक्ष (congress) चालू राहिला परंतु त्या काळातील काँग्रेस आता राहिली नसून सध्याचा काँग्रेस पक्ष (congress) हा द्वेषाने भरलेला पक्ष आहे. तुकडे-तुकडे गँग आणि शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवत आहेत.जनतेने संघटित होऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वर्धा येथे शुक्रवारी आयोजित विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मोदी बोलत होते.
सध्याच्या कॉंग्रेस पक्षातील (congress) देशभक्तीची भावना अखेरचा श्वास घेत आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना
देशोधडीला लावले, त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही. काँग्रेसच्या (congress) धोकेबाजीपासून महाराष्ट्राला आम्हाला वाचवायचं आहे. आजची काँग्रेस हिंदू परंपरांचा द्वेष करत आहे. या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येवून
काँग्रेसला उत्तर द्यावे लागेल. यापूर्वीच्या आघाडी सरकारने जर विश्वकर्मा बांधवांची चिंता केली असती
तर परिस्थिती वेगळी असती. काँग्रेसने जाणीवपूर्वक विश्वकर्मा बांधवाना पुढे जाऊ दिले नाही. या
योजनेचा लाभ एसटी, एससी आणि मागासवर्गीय समाजाला मिळत आहे. विश्वकर्मा कारागीर बनून न
राहता ते उद्योजक बनले पाहिजेत. त्यांना ‘एमएसएमई’चा दर्जा दिला आहे असही मोदी यांनी म्हटले
आहे.
यासोबतच मोदी म्हणाले की, पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशाचा उत्सव आहे. अमरावतीमधील पीएम
मित्र पार्क हे मोठे पाऊल आहे. विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी वर्ध्याला निवडले आहे. वर्ध्यातून
गांधींनी ग्रामीण उद्योगांना चालना दिली होती. टेक्सटाईल क्षेत्रात पुन्हा भारताला गौरव मिळवून देणार
आहे. विश्वकर्मा कामगारांचं जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.