Friday, September 20, 2024

शिवरायांच्या पुतळा कोसळण्यामागे वैभव नाईकांचा हात? – निलेश राणे

Share

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक ट्विट करून उबाठा गटाच्या आमदारावर गंभीर आरोप केलेत. “पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले. शिवरायांचा पुतळा कोसळला यामध्ये वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचा हात तर नाही ना?” अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

निलेश राणे ट्विट मध्ये लिहिलंय कि, ‘आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले, जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी,’ असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय.

अन्य लेख

संबंधित लेख