Saturday, December 21, 2024

विश्वकर्मा कॉलेजच्या आर्यन खोळगडेचे बेल्जियममध्ये आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत यश

Share

पुणे : पुण्यातील विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (VCACS), कोंढवा, आपल्या शैक्षणिक यशासाठीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे चर्चेत आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास प्रयत्न केले आहेत, ज्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा दुसऱ्या वर्षाचा बीएससीचा विद्यार्थी आर्यन खोळगडे.

आर्यन खोळगडेने बेल्जियम, युरोपमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५व्या क्रमांकावर स्थान मिळवले. या यशाने त्याच्या वैयक्तिक कष्टासह, VCACS च्या समर्थनाची महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवली आहे.

VCACS चे प्राचार्य डॉ. अरुण पाटील आणि उपप्राचार्य अंजुम पटेल विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही, तर इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन प्रदान करतात. त्यांच्या समर्थनामुळे व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची साधने आणि प्रोत्साहन प्राप्त होते.

VCACS चे हे सर्वसमावेशक शैक्षणिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते. क्रीडा आणि इतर कलागुण जोपासण्यास प्रोत्साहन देतात. कॉलेजने विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्या तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रकारे विद्यार्थ्यांच्या यशाच्या संपूर्ण विकासासाठी VCACS ने अत्याधुनिक संस्था म्हणून एक आदर्श समोर ठेवला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख