Monday, June 24, 2024

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान

Share

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने 10 जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीची नवीन तारीख जाहीर करण्यात आलीये आली आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणूक: वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • 31  > मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार
  • 10  > जून रोजी अर्जाची छाननी
  • 12  > जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
  • 26  > जून रोजी मतदान होणार
  • 1   > जुलै रोजी होणार मतमोजणी

अन्य लेख

संबंधित लेख