परभणी : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले गेले आहे. तब्बल ₹११५ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ प्रकल्पाला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे.
मेघना बोर्डीकरांचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन
राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक मार्गदर्शनामुळे या अत्याधुनिक प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
परभणी बनेल ‘कौशल्य विकास केंद्र’!
या CIIIT केंद्रातून दरवर्षी ३,००० विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
इंडस्ट्री ४.० चे प्रशिक्षण : या केंद्रात तरुणांना इंडस्ट्री ४.० युगातील प्रगत तंत्रज्ञानाचे (Advanced Technology) प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.
रोजगारक्षमतेत मोठी वाढ : यामुळे परभणी जिल्हा राज्याच्या कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार असून, येथील तरुणांची रोजगारक्षमता (Employability) मोठ्या प्रमाणात वाढेल.
स्थलांतर थांबणार : ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीसाठी शहरांकडे स्थलांतर करावे लागणार नाही. आपल्या जिल्ह्यातच उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योगसंधी उपलब्ध होतील.
आयटी आणि स्टार्टअपचे नवे हब ‘परभणी’!
या प्रकल्पामुळे परभणीची ओळख आयटी आणि स्टार्टअप क्षेत्राचे नवे केंद्र म्हणून निर्माण होणार आहे.
- सेलू परिसरात संधी : सेलू परिसरात सॉफ्टवेअर कंपन्यांना आमंत्रित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातूनच आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग खुला होणार आहे.