मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. “आपली मुंबई घडवूया… मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया” अशा घोषणांसह काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.
पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांमधील ८७ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अनुभवी माजी नगरसेवक आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यंदा काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’सोबत हातमिळवणी केली आहे. या युतीमुळे मुंबईतील दलित आणि मुस्लिम मतांचे समीकरण काँग्रेसच्या बाजूने झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“मुंबईच्या हितासाठी” हा नारा देत काँग्रेसने रस्ते, पाणी, आरोग्य आणि नागरी सुविधांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने काँग्रेसने ही यादी जाहीर करून आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महायुती आणि इतर विरोधी पक्षांच्या याद्या जाहीर होत असताना काँग्रेसनेही आपली यादी जाहीर केली आहे.
मुंबई काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ही यादी प्रसिद्ध केली आहे