Thursday, January 22, 2026

महापौर आरक्षण जाहीर! मुंबई, पुण्यासह १५ शहरांत महिलांचे वर्चस्व; पाहा तुमच्या शहराचे आरक्षण

Share

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर करण्यात आली. या सोडतीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक दिग्गजांची गणिते बिघडली आहेत तर काहींसाठी नवीन संधीची दारे उघडली आहेत.

यावेळच्या आरक्षण सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निम्म्याहून अधिक शहरांचा कारभार आता महिलांच्या हाती जाणार आहे. २९ पैकी १५ महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार असून यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा समावेश आहे.

महानगरपालिका आरक्षणाचा –

महानगरपालिकानवीन आरक्षण प्रवर्ग
बृहन्मुंबई (BMC)खुला (महिला)
पुणेखुला (महिला)
ठाणेअनुसूचित जाती (सर्वसाधारण)
नागपूरखुला (सर्वसाधारण)
नाशिकखुला (सर्वसाधारण)
नवी मुंबईखुला (महिला)
छत्रपती संभाजीनगरखुला (सर्वसाधारण)
पिंपरी-चिंचवडखुला (महिला)
कल्याण-डोंबिवलीअनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
कोल्हापूरओबीसी (सर्वसाधारण)
अहिल्यानगरओबीसी (महिला)
जळगावओबीसी (महिला)
सोलापूरखुला (सर्वसाधारण)
पनवेलओबीसी (सर्वसाधारण)

प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:

  • खुला प्रवर्ग: सर्वाधिक १७ जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, त्यापैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
  • ओबीसी आरक्षण: ओबीसी प्रवर्गासाठी ८ जागा राखीव असून, ४ ठिकाणी महिलांना संधी मिळेल.
  • एससी/एसटी: अनुसूचित जातीसाठी ३ आणि अनुसूचित जमातीसाठी १ जागा राखीव करण्यात आली आहे.

इच्छुकांची धावपळ सुरू

आरक्षण जाहीर होताच महापालिकांमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ज्या शहरांमध्ये आरक्षण बदलले आहे, तिथले इच्छुक उमेदवार आता नव्या आरक्षणाप्रमाणे मोर्चेबांधणी करत आहेत. विशेषतः ‘खुला महिला’ प्रवर्ग असलेल्या मुंबई आणि पुण्यात राजकीय पक्षांना तगड्या महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख