Wednesday, January 15, 2025

…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस

Share


नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टीका केली आहे. “संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत असं समजलं आहे. तिथे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळायला हव्यात अशी अपेक्षा ही बोलून दाखवली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, की या संदर्भात सर्व घटक पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसारचं तिन्ही पक्षांना जागा मिळतील. महायुतीमध्ये भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं भाजपाला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा देखील पूर्ण सन्मान राखला जाईल असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख