Wednesday, January 15, 2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंसाचारावर व्यक्त केली गंभीर चिंता

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) एक निवेदन जारी करून बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांत सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनादरम्यान हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संसंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी हे वक्तव्य केले आहे.

दत्तात्रेय होसाबळे म्हणाले कि, हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या महिलांवरील लक्ष्यित हत्या, लूटमार, जाळपोळ आणि जघन्य गुन्हे आणि बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरील हल्ले अश्या प्रकारची क्रूरता असह्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचा तीव्र शबदात निषेध केला आहे.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अशा घटना ताबडतोब थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, सरकारने पीडितांच्या जीविताचे, मालमत्तेचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. आम्ही जागतिक समुदायाला आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, या कठीण काळात हिंदू, बौद्ध इत्यादी छळ झालेल्या समुदायांसोबत एकजुटीने उभे राहावे.

बांगलादेशच्या परिस्थितीत शेजारी मित्र देश म्हणून योग्य भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारत सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंदू, बौद्ध इत्यादी लोकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख