मुंबई : गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना (Sugar Factory) इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.
केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.
- निवडणूक आयोगाचा उमेदवारांना मोठा दिलासा! नामनिर्देशनपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही; ‘हे’ नियम पाळा!
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन
- महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”
- नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर
- ट्रान्सजेंडर व्यक्तींना आजही का होतोय संघर्ष? आरक्षण, आरोग्य ते सन्मान – सामाजिक स्वीकृतीचा ‘हा’ आहे मार्ग