पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) हे राज्याचे आराध्य दैवत आणि ते राज्याची अस्मिता आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मालवणमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यावेळी 45 किलोमीटर प्रति वेगानं वारे होते, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जी घटना घडली ती दुर्दैवी, वेदनाजनक, क्लेशदायक आणि दुःखदायक आहे…
पण आम्ही पुन्हा महाराजांचा पुतळा उभा करू आणि आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू!!!
१५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसंच शिवप्रेमीचं आकर्षण केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरीक आणि पर्यटकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने २० ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही. अशी टीका होते आहे,
पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत आणि ते राज्याची अस्मिता आहे. पुतळ्याचा आराखडा व उभारणी नौदलाने केली होती. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
- निवडणूक आयोगाचा उमेदवारांना मोठा दिलासा! नामनिर्देशनपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही; ‘हे’ नियम पाळा!
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन
- महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”
- नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर
- ट्रान्सजेंडर व्यक्तींना आजही का होतोय संघर्ष? आरक्षण, आरोग्य ते सन्मान – सामाजिक स्वीकृतीचा ‘हा’ आहे मार्ग