Wednesday, January 15, 2025

राजकोट स्मारकाच्या राजकारणावर शिवभक्त म्हणून अपेक्षा….

Share

छत्रपती शिवरायांचे राजकोट मधील स्मारक कोसळले हा शिवरायांचा अपमानच आहे.आम्ही त्यांचा वारसा समर्थपणे चालवू शकत नाही याचं उदाहरणच जणू सर्वप्रथम या घटनेचा निषेध.

पण तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मोठा अपमान त्या स्मारकावरून सुरू असलेले दुर्दैवी राजकारण आहे. ह्या सर्व राजकारण करणाऱ्यांनी एकदा महाराष्ट्रभरात कितीतरी महाराजांची स्मारके अशी आहेत जी कपड्याखाली प्रशासन परवानगी अभावी झाकली गेलेली आहेत…

कितीतरी ठिकाणी चौथरे आहेत पण परवानगी नाही म्हणून तयार असलेली मूर्ती सुद्धा स्मारकावर ठेवता येत नाहीये.कितीतरी मूर्ती प्रशासनाने रातोरात उचलून नेल्या आहेत.यावर कधी राजकारण करू वाटले?हा शिवरायांचा अपमान नाही का?

याहीपेक्षा मोठा अपमान म्हणजे आज महाराष्ट्रातील शिवरायांचे ७३ गडकिल्ले गडजिहादचा शिकार आहेत.कोठे मशीद उभारली गेलीत तर कुठे मजारी उभ्या आहेत.विशाळगडावर १५६ अनधिकृत अतिक्रमणे आहेत,ज्यात ५०३ व्यक्ती राहतात,१५*१७ चा मलिक रेहान दर्गा म्हणजे २५५ sq feet चा दर्गा आता हजारो sq मध्ये गेलाय.तिथं दारू विक्री,मांस मच्छी असे कितीतरी अवैध धंदे कित्येक वर्षे सुरू आहेत
आणि ह्यावर आम्ही बोलायला सुद्धा तयार नाही?का हा अपमान नाही का?

प्रतापडावरील अफझलखान थडगे होते ३*६ चे कितीतरी वर्ष तिथं अतिक्रमण वाढवलं गेलं..आणि मग जेव्हा ते निघालं तेव्हा कळलं की अफझलखान अतिक्रमण फक्त बाहेर वाढत नव्हत…तर जमिनीत सुद्धा वाढत होत.तो अफझलखान इतका वाढला इतका वाढला की त्याच्या दोन कबरी झाल्यात
हे सगळ्या गोष्टी राजांचा अपमान नाही?

एकट्या पन्हाळा परिसरात १६ अनधिकृत थडगी आहेत..आश्चर्य वाटत ना?आम्ही कधी ह्याकडे पहिलच नाही.लोहगड,विलासगड,चंदन वंदन,अंकाई टँकाई,महिमानगड.आम्ही पाहणे सोडलं आहे..

मित्रानो शिवाजी महाराज फक्त स्मारकात नाही तर हे गडकिल्ले त्यांची जिवंत स्मारक आहेत..जीच आता गडजिहादचे शिकार आहेत…
त्यामुळे त्यांचं संवर्धन करण हे सुद्धा आपल कर्तव्यच आहे.त्यामुळं हे राजकारण करणाऱ्यांना कधीतरी आपण सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे की?
विशाळगड बुरुज कोसळला तेव्हा तुम्ही कुठ होते?त्या बुरुजात पाइपलाइन टाकलेली आहे त्यामुळे तो परत उभा करण्यास अनंत अडचणी येत आहेत..तेव्हा तुम्ही कुठ होते.विशाळगड साठी महाराष्ट्रातील शिवभक्तांनी आंदोलन केले तेव्हा तुम्ही कुठे होतात?
हजारो गडकिल्ले संवर्धनाविना उपेक्षित आहेत..पण आपण का नाही बोलले?तेव्हा तुम्ही कोठे होतात?

परत एकदा…
राजकोट प्रकरण जे झाले ते चूकच आहे.त्याचा निषेधच दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
पण राजकीय पोळी लाटणाऱ्यानी जरा राजकारण बाजूला सोडून शिवभक्त म्हणून विचार करावा.
हीच हाथ जोडून कळकळीची विनंती…

ह.भ.प.श्री. शिरीष महाराज मोरे…
(जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज)

अन्य लेख

संबंधित लेख