Tuesday, December 3, 2024

पाकिस्तान आतंकवादी पोसतात, तसे शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसतात: आचार्य तुषार भोसले

Share

संभाजी ब्रिगेडच्या नवीमुंबई मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये शरद पवारांसमोर पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात अभद्र वक्तव्य केले आहे . यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठींबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाले आहेत . नाशिकमध्ये शरद पवारांविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजप आणि हिंदू संघटनांच्या वतीने आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह साधु-महंतांच्या नेतृत्वात नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर शरद पवारांविरोधात निषेध नोंदवण्यात आला. पाकिस्तान जसं आतंकवादी पोसतात, तसं शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसत असल्याचा दावा तुषार भोसले यांनी केला आहे. तुषार भोसले म्हणाले की, जो जो माणूस हिंदू धर्माचा अपमान करतो, तो तो माणूस शरद पवारांचाच माणूस असतो. जसा आतंकवाद पाकिस्तान पोसतो, तसा हिंदू विरोधी विचार आणि माणसं शरद पवार पोसतात. आयसीस, पीएफआयसारख्या संघटनांकडून हिंदू धर्माला धोका आहे. तसाच शरद पवारांपासून हिंदू धर्माला धोका आहे. हिंदू विरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचे कार्य पवार करतात. हिंदू विरोधी वक्तव्य करणारा प्रत्येक माणूस शरद पवारांशीच कसा संबंधित असतो? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

या झालेल्या घटने मुळे महाराष्ट्रा मधील जनता शरद पवारांवर नाराज झाल्याचे दिसत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख