पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही २० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे.