Saturday, October 19, 2024

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचे पॅकेज जाहीर; मोदी-शाह यांचे शिंदेंकडून आभार व्यक्त

Share

मुंबई : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने 14 पूरग्रस्त राज्यांना 5858.60 कोटी रुपये जारी केले आहेत. जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी १,४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत, हे दाखवून दिले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख