Tuesday, December 3, 2024

कॉंग्रेसच्या आमदारांनी हाती घातले राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ

Share

अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जनकल्याणाचे कार्य पुढे घेऊन जाण्यात त्यांची नक्कीच मोलाची साथ राहील, असा मला विश्वास आहे. अशी भावना अजित पवार यांनी अमरावतीत सुलभाताईंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी व्यक्त केली.

अमरावती शहरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

आमदार सुलभा खोडके यांच्यासमवेत अमरावतीचे माजी महापौर शेख जफर शेखजब्बार, सरचिटणीस अ‍ॅड. शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयुब भाई, सचिव आसिफभाई अशरफ अली, समाजसेवक हाजी रफिक, अ‍ॅड. शब्बीर भाई, अ-रज्ज्जाक उर्फ रज्जु चचा, जोएब भाई बरहानपुरवाली, आणि मुस्तफा भाई बुरहानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सर्वांचे अभिनंदन करतानाच आपण सर्व मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजूट होऊया आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती देऊया असे आवाहन अजित पवार यांनी केले.

अन्य लेख

संबंधित लेख