Thursday, November 21, 2024

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग

Share

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केलं. 288 मतदारसंघांसाठी कालपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. शिवसेनेनं काल १५ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. यात शायना एन. सी. यांना मुंबादेवीतून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, शिवसेनेच्या दोन सहयोगी पक्षांचे उमेदवार आणि मतदारसंघांचाही समावेश या यादीत आहे. जनसुराज्य पक्षाचे अशोक माने हातकणंगले इथून, तर राजश्री शाहुविकास आघाडीचे राजेंद्र येड्रावकर शिरोळमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनं चार उमेदवारांची यादी काल जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही काल १८ उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली.

अन्य लेख

संबंधित लेख