Wednesday, December 4, 2024

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची गडबड…

Share

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची गडबड…नाराजांची समजूत काढण्याचे दिग्गजांकडून प्रयत्न,नाराजांची समजूत काढण्याचे दिग्गजांकडून प्रयत्न होताना दिसत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी विविध पक्षांच्या नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज दाखल केला.

अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसनं  उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सय्यद इम्तियाज जलील यांनी एमआयएम या पक्षाच्या वतीनं औरंगाबाद पूर्व मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

धुळे शहर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे यांनी, धुळ्याचे विद्यमान आमदार फारुक शाह यांनी एमआयएम पक्षाकडून तर सकल मराठा समाजाच्या वतीने राजेंद्र काळे आणि विनोद जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभेसाठी निशिकांत पाटील आणि तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून पृथ्वीराज पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. मिरज विधानसभेसाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

मिलिंद देवरा यांनी वरळी मतदारसंघातून, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला.

अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे साजिद खान तसंच वंचित बहुजन आघाडीकडून झिशान हुसैन यांनी अर्ज दाखल केला. दिंडोशीतून संजय निरुपम, महाडमधून भरत गोगावले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

अन्य लेख

संबंधित लेख