Friday, November 22, 2024

बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी; देशाच्या सुरक्षिततेसाठी वाढता धोका

Share

बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांची (Infiltration of Bangladeshi Muslims) महाराष्ट्रातील वाढती संख्या हे सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ राज्याच्याच नाही तर देशाच्या देखील पुढील मोठे आव्हान ठरत आहे. एका अंदाजाप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या सुमारे १५ कोटी असून या घुसखोरांनी ईशान्य भारतासह, पश्चिम बंगाल, बिहार तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात शिरकाव केल्यामुळे तेथील जनसंख्येच्या प्रमाणावर मोठा प्रभाव पडलेला आहे. सध्या बांगलादेशात पसरलेल्या अराजकामुळे या घुसखोरीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचेही वृत्त
आहे.

१९७५ पासूनच बांगलादेशमधून भारतात घुसखोरी सुरू असली तरी खालिदा झिया यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली. गेल्या काही महिन्यात बांगलादेशातील अराजक व कट्टरपंथिय मुस्लिम पक्ष व संघटनांच्या वाढलेल्या प्रभावामुळे या संदर्भातील चिंता अधिकच वाढलेली आहे.

महाराष्ट्रातील आधी कॉंग्रेस व त्यानंतर मविआ सरकरांच्या कालखंडात बांगलादेशी मुस्लिमांची महाराष्ट्रातील घुसखोरी सातत्याने वाढत गेली असून मुंबई, पुण्यासह वेगवेगळ्या शहरात त्यांनी आपली केंद्रेच बनवण्यात यश मिळवले आहे. त्याखेरीज बांगलादेशी मजूर शेती व पशुपालनाशी संबंधित कामासाठी स्वस्तात तयार होत असल्याने ग्रामीण भागात देखील त्यांनी शिरकाव करण्यास सुरुवात केलेली आहे.

नुकतेच ऑक्टोबर महिन्यात पुणे पोलिसांनी 21 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. जुलै महिन्यात देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी 42 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्याआधी सप्टेंबर महिन्यात पालघर येथे पाच तर नवी मुंबई येथे 7 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात देखील नवी मुंबईत पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. चिपळूण येथे देखील तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या घुसखोरांकडे भारताचा पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यासारखी महत्वाची
कागदपत्रे मिळाली हे अधिकच चिंताजनक आहे. भारतात शिरकाव करून बस्तान बसवलेल्या अनेक
बांगलादेशी घुसखोरांनी मुस्लिमांचे लांगूलचालन करणाऱ्या राजकीय पक्ष आणि काही भ्रष्ट सरकारी
नोकरांच्या वरदहस्तामुळे त्यांना ही कागदपत्रे मिळवता आली. या कागदपत्रांच्या आधारे मतदान करून ते
निवडणुकांच्या निकालांवर प्रभाव पाडू शकतात व भारतीय नागरिकांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी
योजनांचा देखील लाभ घेऊ शकतात.

सप्टेंबर महिन्यात उल्हासनगर येथे अटक करण्यात आलेली बन्ना शेख या नावाची तरुणी तर चक्क रिया उर्फ
आरोही अरविन्द बर्डे हे हिंदू नाव धारण करून अश्लील चित्रपटांमध्ये काम करत होती. बन्ना शेख हिची आई रुबी शेख हिने अंजली असे हिंदू नाव धारण करून अमरावती येथील अरविन्द बर्डे नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे आणि सध्या ती व तिचा पती कतार येथे असतात. बन्ना शेख हिचा भाऊ रियाझ शेख याने रविंद्र असे तर बहीण मोनी हिने रितू असे नाव धरण केले असून ते फरार आहेत. रिया हिच्याकडे भारतीय पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादि कागदपत्रे जप्त करण्यात आलेली असून त्यांच्यावर तिच्या जन्माच्या वेळचा पत्ता म्हणून पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा, हुगळी आणि अचलपूर असे तीन वेगवेगळे पत्ते नमूद केले आहेत.

दहशतवादाखेरीज शस्त्रे, गुरे व माणसांची तस्करी, वेश्याव्यवसाय यासारखी संघटित गुन्हेगारी आणि दरोडे, बलात्कार, चोरी यासारख्या अन्य गुन्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा लक्षणीय सहभाग असल्याचे निरीक्षण महाराष्ट्रासह विविध राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नोंदवलेले आहे. पकडलेल्या जवळपास सर्व बांगलादेशी घुसखोरांकडून इन माय ओपिनियन (आयएमओ) या चॅटिंग आणि इंटरनेट कॉलिंग करण्यासाठी निर्माण केलेल्या अ‍ॅपचा वापर केला जात होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. दहशतवादी एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी वापर करत असल्याने भारत सरकारने या अ‍ॅपवर बंदी घातलेली आहे. याखेरीज पुण्यात बोपदेव घाट येथे महाविद्यालयीन तरुणीवर नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या संदर्भात अटक केलेले आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे वृत्त आहे.

बांगलादेशी नागरिकांच्या महाराष्ट्रातील या घुसखोरीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष सातत्याने आवाज उठवत आला आले. 1995 मध्ये युती सत्तेत निवडून आल्यावर बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात व्यापक मोहीम उघडण्यात आली होतीत्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सत्तारूढ झाली तेव्हा ही मोहीम बंद पडली.

बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या व त्यांच्या कारवाया लक्षात घेता बांगलादेशी घुसखोरांना हाताशी धरून दहशतवाद माजवणे व अराजक पसरवण्याचे कारस्थान रचले जात आहे काय अशी शंका उत्पन्न होते. ही परिस्थिति अधिक स्फोटक होण्यापासून रोखण्यासाठी आपण सजग राहून प्रखर राष्ट्रप्रेमाने प्रेरित व जनतेचे हित आणि सुरक्षा यासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षास देशाप्रमाणे राज्यातही सत्तारूढ करणे अत्यावश्यक आहे. आज आपण यामध्ये हयगय केली तर येणार्‍या काळात आपले सर्व अस्तित्वच धोक्यात येऊ शकेल हे मतदान करताना ध्यानात ठेवणे ही काळाची गरज आहे.

अन्य लेख

संबंधित लेख