महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने युतीच्या संख्येत 41 जागांचा वाटा उचलला. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत (MVA) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. हा निकाल महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे.
या निवडणुकीत यंदा विविध राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी 1 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजय संपादन करून ऐतिहासिक यश मिळवले आहे. यामध्ये, महायुतीच्या १५ उमेदवारांनी 1 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. यामध्ये भाजपच्या ८, शिवसेनेच्या ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ उमेदवारांचा समावेश आहे. तर, महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याला 1 लाखाहून अधिक मताच्या फरकाने विजय मिळवता आला नाही.
क्र. | विधानसभा मतदारसंघ | विजयी उमेदवार | मार्जिन | पराभूत उमेदवार |
1. | शिरपूर | काशीराम वेचन पावरा (भाजपा) | १,४५,९४४ | डॉ.जितेंद्र ठाकूर (अपक्ष) |
2. | मेळघाट | केवलराम काळे (भाजपा) | १,०६,८५९ | डॉ. हेमंत नंदा चिमोटे (काँग्रेस) |
3. | नागपूर पूर्व | कृष्णा खोपडे (भाजपा) | १,१५,२८८ | दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी – एसपी) |
4. | बागलाण | दिलीप मंगलू बोरसे (भाजपा) | १,२९,२९७ | दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी) |
5. | बोरिवली | संजय उपाध्याय (भाजप) | १,००,२५७ | संजय भोसले (शिवसेना- यूबीटी) |
6. | चिंचवड | शंकर जगताप (भाजप) | १,०३,८६५ | राहुल कलाटे (राष्ट्रवादी – एसपी) |
7. | कोथरूड | चंद्रकांत पाटील (भाजप) | १,०३,८६५ | राहुल कलाटे (राष्ट्रवादी – एसपी) |
8. | सातारा | शिवेंद्रराजे भोसले (भाजप) | १,४२,१२४ | अमित कदम (शिवसेना – यूबीटी) |
9. | मालेगाव बाह्य | दादाजी भुसे (शिवसेना) | १,०६,६०६ | अव्दय हिरे (शिवसेना- यूबीटी) |
10. | ओवळा माजीवाडा | प्रताप सरनाईक (शिवसेना) | १,०८,१५८ | नरेश मनेरा (शिवसेना- यूबीटी) |
11. | कोपरी पाचपाखडी | एकनाथ शिंदे (शिवसेना) | १,२०,७१७ | केदार दिघे (शिवसेना- यूबीटी) |
12. | बारामती | अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस) | १,००,८९९ | युगेंद्र पवार (राष्ट्रवादी – एसपी) |
13. | मावळ | सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) | १,०८,५६५ | बापू भेगडे (अपक्ष) |
14. | कोपरगाव | आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) | १,२४,६२४ | संदीप वर्पे (राष्ट्रवादी – एसपी) |
15. | परळी | धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) | १,४०,२२४ | राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी – एसपी) |