ठाणे – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरील सस्पेंस दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या आजारपणामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital Thane) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज स्वतः शिंदे रुग्णालयात पोहोचले, त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि सुरक्षारक्षकांचा फौजफाटा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झाले असून त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांचे सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्रांती घेत असताना त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याने ही पावलं उचलण्यात आली आहेत.
शिंदे यांनी गेले तीन ते चार दिवस घराबाहेर पडले नव्हते, परंतु आजच्या उपचारांसाठी त्यांना बाहेर पडावे लागले. या काळात, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू असताना, शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी गेले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. दोन दिवसांनी ते पुन्हा ठाण्यात परतले होते, पण त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याचे दिसून आले.