Sunday, December 22, 2024

33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न; खातेवाटपाकडे राज्याचे लक्ष

Share

नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra) महायुती सरकारच्या (Mahayuti Government) मंत्रिमंडळाचा (Cabinet) बहुप्रतिक्षीत शपथविधी सोहळा काल नागपूरमधील राजभवनात मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार समाविष्ट आहेत. शपथविधी सोहळ्यात 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपद तर 6 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, काही महत्त्वाचे नेते वगळले गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या शपथविधीनंतर आता साऱ्यांचे लक्ष खातेवाटपावर केंद्रित झाले आहे. कोणाला कोणते खाते मिळणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. खातेवाटपाच्या निर्णयातून सरकारच्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख