Friday, August 29, 2025

मराठा आरक्षण मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ‘ऑन-ग्राउंड’ पाठिंबा; आंदोलकांना केली मोठी मदत

Share

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांना आता सत्ताधारी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत आहे. वसमतचे (Vasmat) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार राजू नवघरे (Raju Navghare) हे केवळ या मोर्चात सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आंदोलकांसाठी ठिकठिकाणी भोजन आणि पाण्याची सोय करून मदतीचा हात दिला आहे.

जुन्नर जवळ मुक्कामी असलेल्या मराठा बांधवांना गुरुवारी सकाळी अल्पोपहाराची सोय झाली. यानंतर गुरुवारी सकाळी जेवण आणि पाण्याची सोय आमदार नवघरे यांनी केली. त्यांनी ५० क्विंटल तांदुळाची खिचडी आणि ४ ट्रक पाणी बॉटल उपलब्ध करून दिली. यावेळी आमदार नवघरे यांच्यासह वसमत तालुक्यातील अनेक स्वयंसेवक सेवेत होते. बाभुळगाव या त्यांच्या मूळ गावातून तीनशेहून अधिक मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.

यावेळी आमदार नवघरे यांनी मराठा आरक्षणाला आपला जाहीर पाठिंबा दिला. “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी सातत्याने विधानसभेत आवाज उठवत आहे. आताही या आरक्षण चळवळीत सहभागी झालो. समाजाला न्याय मिळेपर्यंत जेवढे योगदान देता येईल तेवढे मी देणार,” असे आमदार नवघरे यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख