Tuesday, November 25, 2025

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न

Share

अयोध्या, (उत्तर प्रदेश): तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्या (Ayodhya) नगरीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या दिव्य मंदिराच्या शिखरावर भारताच्या धार्मिक-सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रतीक असलेला भगवा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते हा अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ सोहळा पार पडला.

या सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून आलेल्या साधू-संत, ट्रस्टचे सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण अयोध्या नगरी आणि राम मंदिर परिसर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आला होता.

अन्य लेख

संबंधित लेख