Saturday, November 23, 2024

हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारक

Share

एकेकाळी आपली भारतभूमी ही सर्वार्थाने संपन्न भूमी होती. ही संपन्नता केवळ आर्थिक नव्हती तर आपल्या देशात कला, साहित्य आणि विद्या यांनीही उत्कर्ष गाठला होता. एक सुसंस्कृत राष्ट्रजीवन येथे नांदत होते.
आपल्या भारतभूमीवर अनेक परकीयांनी आक्रमणे केली. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीचा भारताचा साधारण हजार वर्षाचा इतिहास हा अनवरत संघर्षाचा इतिहास आहे. येथील हिंदू समाजाने त्याग, बलिदान करत इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार केला.

असहिष्णू वृत्तीच्या मुस्लिम आक्रमकांनी आर्थिक लूट तर केलीच पण अनेक मंदिरांचा विनाश केला. भारतावरील मुस्लिम आक्रमण हे राजकीय नसून धार्मिक आक्रमण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- “ही मुस्लिम आक्रमणे केवळ लूट किंवा विजयाच्या लालसेपोटी केलेली नव्हती. त्यांच्या मागे आणखी एक हेतू होता… हिंदूंच्या मूर्तिपूजा आणि अनेकेश्वरवादावर प्रहार करणे आणि भारतात इस्लामची स्थापना करणे हे देखील या मोहिमेचे एक उद्दिष्ट होते याबद्दल मुळीच शंका नाही” ( संदर्भ – Dr. Babasaheb Ambedkar -Writing and Speeches, Volume No.8 Page No.55)

मुस्लिम आक्रमकांनी भारतात केलेल्या मंदिरांच्या विध्वंसाने इतिहासाची
अशाप्रकारे मुस्लिम आक्रमकांनी देशभरात हजारो मंदिरे जमीनदोस्त केली. सुंदर वास्तू आणि मूर्तीचा विनाश केला.पुढे मराठ्यांचा उत्तर भारतात प्रभाव वाढला तेव्हा मंदिरांचा विध्वंस तर थांबलाच पण अनेक मंदिरे पुन्हा बांधण्यात आली. या कार्यात अहिल्यादेवी होळकर यांचे मोठे योगदान आहे. या शिवाय त्यांनी नव्यानेही अनेक मंदिरे, घाट बांधले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्री काशी विश्वनाथ मंदिर, श्री सोमनाथ मंदिर, वैजनाथ, श्री घृष्णेश्वर (वेरूळ) आदी मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. याशिवाय श्री ओंकारेश्वर, श्री भीमाशंकर आदी ठिकाणी त्यांनी घाट, मंदिरे, धर्मशाळा बांधून धर्मादाय कार्य केले आहे. हिंदू धर्माचा त्यांना अभिमान होता. शिवपिंडीच्या रूपाने शिवाला साक्षी ठेवून त्यांनी हिंदू धर्माचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यबाहेरदेखील मंदिरे, घाट बांधले यावरून त्यांचा व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन स्पष्ट होतो.

विशेष म्हणजे हे सर्व जीर्णोद्धार आणि नवनिर्मितीचे कार्य अहिल्यादेवींनी खाजगी खर्चातून केले आहे. सरकारी कोषातील एक पैसाही त्यांनी या कामी वापरला नाही.संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींनी मंदिरे, वास्तू, जलकुंडे आणि बारवांची निर्मिती केली.

संदर्भ -‘वेध अहिल्याबाईंचा’- डॉ. देवीदास पोटे

अन्य लेख

संबंधित लेख