Thursday, October 10, 2024

“… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल

Share

शिरूर लोकसभा : “विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या”, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) हल्लाबोल केला आहे. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन येथे जाहीर सभा झाली. यावेळी अजित पवार बोलत होते.

सत्तेतून प्रश्न मार्गी लागतात म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलोआहोत. मी कामाचा माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ती आहे. उरळी कांचन करांनो समोरच्या व्यक्तींला खासदार की मध्ये काहिच रस नाही. त्यामुळे आपल्यासाठी कामाची असणारी व्यक्ती म्हणजे आढळराव पाटील आहेत, त्यांना विजयी करा. थेऊर कारखाना सुरु करणे, उपबाजार, ट्रँफिक असे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू.

“सत्तेतून प्रश्न मार्गी लागतात म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलो. मी कामाचा माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ती आहे. उरळी कांचन करांनो समोरच्या व्यक्तींला खासदार की मध्ये काहिच रस नाही. त्यामुळे आपल्यासाठी कामाची असणारी व्यक्ती म्हणजे आढळराव पाटील आहेत, त्यांना विजयी करा. थेऊर कारखाना सुरु करणे, उपबाजार, ट्रँफिक असे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू”, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

“अनेकदा मी उरुळी कांचनला आलो आहे. अनेक सभा घेतल्या आहेत. तुम्ही पण मला 33 वर्षे झाली 91 साली मला खासदार म्हणून निवडून दिले होते. तसा आपला जुना संबंध आहे. ही निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायची. देश कोण योग्य दिशेने घेऊन जाईल याबाबतची आहे. कोणाच्या विचाराचा खासदार दिल्लीमध्ये निवडून पाठवायचा आहे याबाबतची ही निवडणूक आहे. मागील काळातील 2004, 2009 व 2014 अशा निवडणुकांमध्ये आम्ही अनेकदा आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला परंतू आढळराव पाटील यांचा शेवटच्या मतदारासोबत असलेला कनेक्ट, सामाजिक काम, डाऊन टू अर्थ राहण्याची त्यांची पद्धत यामुळे ते आम्हाला शक्य होत नव्हते”, असंही ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख