Monday, April 13, 2026

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी

Share

अमरावती : जिल्ह्याच्या आरोग्य आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (GMC) प्रश्न आता सुटला आहे. अमरावती येथील बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी अखेर जागा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

आलियाबादची ११.२९ हेक्टर जागा सुपूर्द
अमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथील सर्व्हे क्र. ९/१ मधील ११.२९ हेक्टर जागेचा अंतिम ताबा आता वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाकडे सोपवण्यात आला आहे. या जागेवर आता आधुनिक वैद्यकीय संकुल उभे राहणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
प्रवेश क्षमता:
दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची (MBBS) संधी मिळणार आहे.

रुग्णालय क्षमता: महाविद्यालयाला जोडूनच ४३० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारले जाईल.

विदर्भाला फायदा: विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि नागरिकांना उपचारासाठी नागपूर किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्विट जसेच्या तसे:
“अमरावतीकरांसाठी खुशखबर!

बहुप्रतीक्षित अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी जागा प्रदान

अमरावती जिल्ह्यासाठी आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय

मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांचे मनपूर्वक आभार

अमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथील सर्व्हे क्र. ९/१ मधील ११.२९ हेक्टर जागेचा अंतिम ताबा वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागास प्रदान करण्यात आला.

या जागेवर १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील. अमरावती व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल.

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटतो. या जिल्ह्यातील नागरिकांनी ही मागणी केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळू शकले. आज जागेच्या निकड मार्गी लागली. आरोग्यसेवा म्हणजे ईश्वरसेवा, हा ध्यास फडणवीस सरकारचा आहे. पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतो. अमरावतीकरांना शुभेच्छा देतो.

धन्यवाद देवेंद्रजी!! गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला..”

अन्य लेख

संबंधित लेख