Wednesday, December 4, 2024

कृष्ण प्रभू दास प्रभू यांच्यावरील कारवाईबाबत चिंता…

Share

कृष्ण प्रभू दास प्रभू ( Krishna Das Prabhu ) यांच्यावर बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या कारवाईबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.  त्यांच्या बांगलादेशातील अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांना जामीन न मिळणंही योग्य नाही असंही भारताने म्हटलं आहे.

बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सध्या अन्याय केला जात आहे. गेली अनेक वर्ष हिंदू बांग्लादेशमध्ये वास्तव्य करत आहेत. मात्र अतिरेकी घटकांकडून हिंदूंवर हल्ले केले जात आहेत. याविरुध्द हिंदू समुदाय एकत्र आला आहे. मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या विशिष्ट घटकांकडून केला जात आहे.  

कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेबाबत आणि त्यांना जामीन नाकारला गेल्याने आम्ही चिंतेत आहोत. या प्रकरणाची गंभीर दखल भारताने घेतली आहे. बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ही पहिलीच घटना आहे. अल्पसंख्य हिंदूंची घरं जाळणं, त्यांच्या व्यावसायिक आस्थापना, कार्यालयं यांची जाळपोळ करणं, लूटमार, तोडफोड या घटना घडल्या आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. शांततापूर्ण मेळाव्यांतून आपलं मत मांडणाऱ्या आणि हिंदूंच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या दास यांना यांना अटक करणं आणि जामीन नाकारणं ही बाबत दुर्दैवी आहे असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्य आहेत त्यांच्या सुरक्षेबाबत कृष्ण दास प्रभूंनी चिंता व्यक्त केली त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्ण दास प्रभू (Krishna Das Prabhu) यांनी हिंदूंच्या रॅलीजना सुक्षा द्या अशी मागणी केली होती. मात्र या मागणीमुळे त्यांना ढाका येथील विमानतळावर अटक करण्यात आली.

अन्य लेख

संबंधित लेख