Wednesday, January 29, 2025

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य

Share

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये (Jammu Kashmir and Haryana) प्रत्येकी 90 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या मोजणीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये 27 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष 42 जागांवर पुढे आहे. हरियाणामध्ये भाजप 49 जागांवर, तर कॉंग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या मतमोजणीचा लेखाजोखा देण्यात आला आहे. सकाळी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीत हा कल दिसून येत आहे.

उधमपूर पूर्वमध्ये भाजपचे माजी नेते पवन खजुरिया आघाडीवर आहेत. तिकीट नाकारल्यानंतर भाजप सोडणारे खजुरिया भाजपच्या आरएस पठानिया यांच्या विरोधात 1,816 मतांनी आघाडीवर होते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, CPI(M) चे मोहम्मद युसूफ तारिगामी कुलगाम मतदारसंघातून 3,654 मतांनी आघाडीवर आहेत.

माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या पीडीपी उमेदवार इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरामध्ये पराभव स्वीकारला आहे. “मला जनतेचा निर्णय मान्य आहे. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी सदैव माझ्यासोबत राहील. माझ्या पीडीपी कार्यकर्त्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते,  ज्यांनी या प्रवासामध्ये खूप मेहनत घेतली,” तिने X वर पोस्ट केले.

हरियाणामध्ये गुडगाव जिल्ह्यातील चारही मतदारसंघात भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. सुमारे 15 लाख मतदारांनी आपली पसंती मतपेटीत बंद केली आहे. गुडगाव जिल्ह्यात चार म्हणजे गुडगाव, पटौडी, बादशाहपूर आणि सोहना विधानसभा जागा आहेत. नवीन गोयल यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार मुकेश शर्मा १७९६३ मतांनी आघाडीवर आहेत, जे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, गोयल यांना या जागेवरून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. बादशाहपूरमध्ये भाजपचे राव नरबीर सिंह आघाडीवर आहेत

अन्य लेख

संबंधित लेख