भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, विधानसभा प्रमुख सुभाष गुप्ता, रवी चिल्मे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य, भाजपाची विचारधारा आणि विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश केलेल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.
| अंबरनाथची जनता दडपशाहीच्या विरोधात मतदान करेल अंबरनाथमधील सूज्ञ मतदार दडपशाहीच्या विरोधात मतदान करतील. निवडणुकांच्या काळात अंबरनाथ परिसरात जंगलराज वर्षानुवर्षे अनुभवास येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात गुंडगिरीला थारा नसून गुंडांना कठोर शासन होते. पारदर्शक व्यवहारासाठी भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, यात भाजपाला नक्की यश मिळेल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दहशत माजवणा-यांचा पोलीस यंत्रणांनी तपास करायला हवा असेही चव्हाण यांनी नमूद केले. |