Friday, September 13, 2024

५०० वर्षांनंतर साजरी झाली रामनवमी: अयोध्येच्या राम मंदिरातील ऐतिहासिक क्षण

Share

अयोध्या हे पवित्र शहर सध्या रामनवमीच्या आनंदोत्सवात मग्न आहे, ५०० वर्षानंतर प्रथमच भव्य राम मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीच्या मुक्तीसाठी अनेक शतके चाललेल्या कायदेशीर लढाई नंतर जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा नेत्रदीपक प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर हा पहिलाच रामनवमी उत्सव आहे.

राम नवमी भगवान विष्णू चे सातवे अवतार श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. साजरा करतो. या वर्षी चा उत्सव हा भगवान रामाच्या भक्तांसाठी विशेष आहे. अयोध्येतील राम मंदिर फुलांनी आणि हजारो दिव्यांनी सुशोभित केले गेले आहे. या रामनवमी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सूर्य टिळक सोहळा, आजच्या दिवशी सूर्यप्रकाशाचा किरण सुमारे पाच मिनिटे राम लल्लाच्या कपाळाला हळूवारपणे स्पर्श करेल. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI), रुरकी च्या सहयोगाने सूर्य टिळकाची संकल्पना साकार झाली आहे. या ‘सूर्य टिळक’ सोहळ्याचे हिंदूंसाठी मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. सूर्यवंशाचे वंशज म्हणून, प्रभू राम यांना सूर्यवंशी म्हणून संबोधले जाते, त्यामुळे सूर्य टिळक हा सूर्याशी प्रभू रामाच्या दैवी संबंधाचे प्रतीक आहे. प्रकाशाचे हे दैवी चिन्ह सूर्यदेवाचा आशीर्वाद म्हणून पाहिले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने बांधलेल्या राम मंदिरातील पहिल्या रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सामावून घेण्यासाठी मंदिर ट्रस्टने दर्शनाचा कालावधी तब्बल १९ तासांपर्यंत वाढवला आहे. हा ऐतिहासिक उत्सव दिवस पाहण्यासाठी शतकानुशतके वाट पाहणाऱ्या भक्तांच्या विश्वासाचा पुरावा आहे. अयोध्येतील राम मंदिर हे एकतेचे प्रतीक आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारे आहे.

अन्य लेख

संबंधित लेख