Wednesday, December 4, 2024

निवडणुकीत हिंदुत्वाचा मार्ग आडवणाऱ्यांसोबत राजकारणाचे युद्ध खेळताना हिंदू समाजाने 100% मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी.. – भाऊ तोरसेकर

Share

कोल्हापूर मध्ये प्रबोधन मंचाने राजकीय हिंदुत्व या विषयवार आज भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

सम्राट नगर कोल्हापूर येथील राम मंगल कार्यालयामध्ये मराठी पत्रकारितेचा चालता बोलता विश्वकोश असलेल्या भाऊंनी आपल्या नर्मविनोदी, खुसखुशीत आणि काही वेळा परखड अशा शैलीत या विषयावर विचार मंथन केले.

त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य भर हा मतदान जागृती करून मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल यावर होता.

यात त्यांनी मोदींचा उदय आणि त्यानंतर बदलत चाललेली भारतीय परिस्थिती यावर अनेक उदाहरणे देऊन ती हिंदुत्वासाठी कशी पोषक आहेत, याविषयी मार्गदर्शन केले.

भारतीय समाज हा हिंदुत्वामुळे मुळातच सहनशील आणि धर्मनिरपेक्ष म्हणजेच इतर कोणत्याही धर्मावर बळजबरी न करणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आणि भारताची ओळख अशीच टिकवणे गरजेचे आहे आणि यासाठी भारतामध्ये हिंदुत्व का आवश्यक आहे याचा त्यांनी उहापोह केला.

2024 च्या निवडणुकीमध्ये मोदी आणि भाजप यांची झालेली थोडीशी पिछेहाट ही काही हार नसून मतदार काहीशे सुस्तावलेले आणि बेसावध असल्याने झाली असल्याचे मत त्यांनी मांडले. त्याचमुळे येणाऱ्या आणि इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला हक्क शंभर टक्के निभावणे हे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

लोकशाहीमध्ये आपल्या अपेक्षा कोणत्याही असोत त्याचे उत्तर केवळ मतपेटी द्वारे देणे कसे आवश्यक आहे याचे त्यांनी अनेक दाखले दिले. जवळपास दोन तासाहून अधिक चाललेल्या या कार्यक्रमात त्यांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, धमाल किस्से आणि अनेक गोष्टींचा आधार घेत श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलेले होते.

या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. भाऊंच्या विनोदांना, किश्यांना खळखळून दाद देताना, आपण मतदानास जाणे किती आवश्यक आहे याची जाण आणि भान प्रत्येक श्रोत्याला आल्याचे यावेळी दिसून आले.

याचवेळी 100 टक्के मतदान करण्याचा संकल्प सर्वांनी केला

अन्य लेख

संबंधित लेख