Wednesday, December 17, 2025

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर

Share

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे बंधूंना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्रमक भूमिका घेत, ही लढाई केवळ सत्तेची नसून, ‘मुंबई कोणाची?’ हे ठरवणारी अंतिम लढाई असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपने निवडणुकीच्या केंद्रस्थानी ठाकरे बंधूंचा ‘अहंकार’ आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासनिष्ठ नेतृत्व’ या दोन भिन्न विचारांमधील संघर्ष आणला आहे.

ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या विकासनिष्ठ नेतृत्वाची टक्कर

एका बाजूला, “मुंबईला घराण्याची मालमत्ता समजणाऱ्या ठाकरे बंधूंच्या अहंकाराविरुद्ध” ही लढाई आहे. तर, दुसऱ्या बाजूला, “मुंबईचा सेवक मानणाऱ्या, आणि मुंबईकरांनाच मालक मानणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या विकासनिष्ठ नेतृत्वाची” ही लढत आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमधून ठाकरे बंधूंवर केली आहे.

“मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, ही निवडणूक मुंबईच्या भविष्यासाठी आहे,” असे स्पष्ट करून केशव उपाध्ये यांनी मुंबईकरांना थेट भावनिक आणि राजकीय साद घातली आहे. या आक्रमक भूमिकेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तापमान प्रचंड वाढले असून, ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख