मंडी लोकसभा : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूडची (Bollywood) धडाकेबाज क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) यावेळी राजकारणात हात आजमावला आणि पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.
कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होती. त्यांचा मुकाबला काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांच्याशी होता. त्यांनी विक्रमादित्य सिंह यांचा ७४ हजार ७५५ मतांनी पराभव केला आहे. कंगना राणौतला 5 लाख 37 हजार 022 मतं पडली आहेत. ता, त्यांचे प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंह यांना 4 लाख 62 हजार 267 मतं पडले. 5645 लोकांनी याठिकाणी नोटाचे बटण दाबले आहे.
विजयानंतर कंगना रणौतने सोशल मीडियावर तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “या पाठिंब्याबद्दल, प्रेम आणि विश्वासाबद्दल मंडीतील सर्व जनतेचे मनःपूर्वक आभार. हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा मंडीच्या सन्मानाचा विजय आहे,” असती म्हणाली.