महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आणि त्यापलीकडे मराठीच्या समृद्ध साहित्यिक वारशाची ऐतिहासिक ओळख म्हणून अभिमानाची आणि उत्सवाची लाट पसरली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती.