Sunday, October 13, 2024

Central Government: केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल – मंत्री अश्विनी वैष्णव

Share

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Central Government) गेल्या १०० दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. काल संध्याकाळी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन कोटी घरे दिली जाणार असून ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दरवर्षी ५ लाख रुपये मिळणार आहेत. रोजगार निर्मिती सुलभ करण्यासाठी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इनिशिएटिव्ह योजना सुरू करण्यात आली असल्याचं सांगताना गेल्या शंभर दिवसांत शेतकऱ्यांसाठी आठ नवीन योजना सुरू करण्यात आल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं.

अन्य लेख

संबंधित लेख