Saturday, October 12, 2024

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी

Share

नागपूर : नागपूरमध्ये रविवारी रात्री एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता हा अपघात घडला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघं जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. जेव्हा कारचा अपघात झाला तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा देखील गाडीत होता. तो गाडीतील मागच्या सीटवर बसला होता अशी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याच मुद्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासावेत,कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो. सुदैवाने या अपघातात परमेश्वराच्या कृपेने कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या अपघाताची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

अन्य लेख

संबंधित लेख