पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) हे राज्याचे आराध्य दैवत आणि ते राज्याची अस्मिता आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मालवणमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यावेळी 45 किलोमीटर प्रति वेगानं वारे होते, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जी घटना घडली ती दुर्दैवी, वेदनाजनक, क्लेशदायक आणि दुःखदायक आहे…
पण आम्ही पुन्हा महाराजांचा पुतळा उभा करू आणि आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू!!!
१५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसंच शिवप्रेमीचं आकर्षण केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरीक आणि पर्यटकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने २० ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही. अशी टीका होते आहे,
पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत आणि ते राज्याची अस्मिता आहे. पुतळ्याचा आराखडा व उभारणी नौदलाने केली होती. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
- साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
- धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र
- अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरु पॉल दिनाकरन यांना अटक करा; सांगलीत ‘सकल हिंदू समाजा’ची मागणी
- गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू
- ‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध